सुनीता नारायण - लेख सूची

फक्त हवा उपभोग, नवा नवा उपभोग

या वर्षीचे केंद्रीय अंदाजपत्रक दूरदृष्टीचे नव्हते. त्यात जगापुढील नव्या, परिणामांनी भीषण आणि एकमेकांशी निगडित अशा आह्वानांचा विचार नव्हता. अन्नाच्या किंमती वाढत जाणार भारतातही त्या वाढताहेत आणि जगात अनेक ठिकाणी अन्नासाठी दंगे झाले आहेत. दुसरे म्हणजे खनिज तेलाच्या किंमती वाढत जाणार मध्ये त्या बॅरलला १४० डॉलर्सला गेल्या होत्या. सध्या उतरल्या आहेत, पण कधीही चढू शकतात. तिसरे …

जुनाच भ्रष्टाचार बरा?

इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यून च्या एका वार्ताहराने मला अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात वापरत असलेल्या ‘आधुनिक लॉबीइंगच्या प्रकारां’वर माझे मत विचारले. [लॉबीइंग, lobbying म्हणजे कोणत्याही दबावगटाने राष्ट्रीय धोरण आपल्या गरजांनुसार व्हावे, यासाठी केलेले प्रयत्न आपल्याकडे आज या अर्थी ‘फील्डिंग लावणे’ हा शब्दप्रयोग केला जातो. अमेरिकेत लॉबीइंग ‘ऑफिशियल’ व कायदेशीर आहे. सं.] माध्यमांमध्ये ‘स्टोऱ्या’ पेरणे, वैज्ञानिक व विचारवंतांशी …

खऱ्या बदलाचा प्रयत्न

भ्रष्ट लालूप्रसाद यादवांच्या विरोधातील संसद-बहिष्काराने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी विधेयक रखडले आहे. आज त्याचे भवितव्य एका भाजप खासदाराच्या अध्यक्षतेखालील समितीच्या हाती आहे, आणि त्याने काम न करायचे ठरवले आहे. भ्रष्टाचार भारतात अनेक रूपे घेतो. डिसेंबर २००४ मध्ये विधेयक संसदेपुढे मांडले गेले तेव्हा लक्षावधी गरिबांना रोजगार पुरवण्यासाठीच्या पैशावर बरीच ‘हाथापायी’ करावी लागली होती. शेवटी एक क्षीण …